ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठी संस्कृतीत घरी सुवासिन किंवा कुमारिका आली तर तिला हळद-कुंकू लावल्याशिवाय घराबाहेर पडू दिलं जात नाही.
तसेच सणावाराच्या दिवसांमध्ये देवाला, येणाऱ्या महिलांना आणि स्वतःच्या कपाळालाही हळद-कुंकू लावताना आपण पाहतो.
विवाहितेसाठी ‘कुंकू’ हा सौभाग्यालंकार आहे म्हणूनच हळद-कुंकू लावण्याची शास्त्रात काही पध्दती सांगितल्या आहेत.
कुंकू कोणत्या बोटानं लावावं? हेच आज जाणून घ्या
कोणा दुसऱ्या व्यक्तीला कुंकू लावायचं झाल्यास, मध्यमेचा वापर करण्याचा सल्ला शास्त्र देतं.
पुरुष किंवा महिला, दुसर्यांना कुंकू लावतांना मध्यमेचा वापर करणं फायद्याचं ठरतं अशी मान्यता आहे.
दुसर्या व्यक्तीला स्पर्श करताना त्याच्यातील वाईट शक्तींचा संचार आपल्या शरीरात बोटाच्या माध्यमातून होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत मध्यमा बोटाचं बळ ते थोपवून धरतं आणि आपल्या शरीराचं रक्षण करतं.