Shreya Maskar
काकडी ही कमी कॅलरी आणि पोषक तत्वांनी भरलेली आहे. यात ९६% पाणी असते. रोज एक काकडी खा आणि हेल्दी रहा.
काकडीतील पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे, ते शरीराचे तापमान आणि ऊर्जेची पातळी नियंत्रित ठेवून, तुमच्या रोजच्या द्रवपदार्थांच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करते.
काकडी कॅलरीजचा उत्तम स्त्रोत आहे. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. तुम्ही सॅलडच्या स्वरूपात काकडीचे सेवन करू शकता.
पाणी आणि पेक्टिनसारखे विद्राव्य फायबर नियमित मलविसर्जनास मदत करतात आणि बद्धकोष्ठता टाळतात.
काकडीमध्ये व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते, जे रक्त गोठण्यास आणि हाडांच्या आरोग्यासाठी मदत करते.
पोटॅशियम आणि मॅग्नेशियम रक्तदाब कमी करण्यास आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सांभाळण्यास मदत करतात.
काकडीच्या थंड चकत्या त्वचेवर किंवा डोळ्यांवर ठेवल्याने जळजळ शांत होण्यास, सूज कमी होण्यास आणि थंडावा मिळण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.