Kokani Recipes: बाहेरुन कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट; कोकणी स्टाईल नारळाचे वडे बनवण्याची पारंपारिक रेसिपी वाचा

Sakshi Sunil Jadhav

ओल्या नारळाचे वडे

ओल्या नारळाचे वडे हा कोकणी व ग्रामीण भागातला लोकप्रिय आणि पारंपरिक नाश्ता मानला जातो. तुम्ही कोकणी असाल तर नक्कीच ही डीश तुम्हाला आवडेल.

Khobryache Vade

४ ते ६ जणांसाठी योग्य

पुढे दिलेल्या साहित्यापासून संपूर्ण कुटुंबासाठी पुरेसे वडे तयार होतील. ही रेसिपी अत्यंत सोपी आणि चवीला एकदम मस्त आहे.

Kokani coconut vade

साहित्य

दोन वाट्या तांदूळ, अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ, ५ ते ६ सुक्या लाल मिरच्या, ४ ते ५ हिरव्या मिरच्या, २ वाट्या खोवलेले ओले खोबरे, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तेल.

fresh coconut vade recipe

तांदूळ आणि डाळी

तांदूळ व डाळी भिजत घालाव्यात. चार तासांनंतर तांदूळ आणि डाळी पाण्यातून काढून वाटून घ्याव्यात.

authentic konkani food

ओल्या खोबऱ्याची खासियत

खोवलेले ओलं खोबरं वड्यांना नैसर्गिक गोडसर चव आणि मऊपणा मिळतो. त्यामुळे यात त्याचा वापर खूप आवश्यक आहे.

authentic konkani food

मिरचीचा झणझणीत तडका

लाल सुक्या मिरच्या आणि हिरव्या मिरच्या बारीक वाटून त्याचा गोळा करुन घ्या. त्याने वडे चवीला मस्त झणझणीत लागतील.

coconut vade recipe

वाटण घट्ट ठेवा

पीठ जास्त बारीक किंवा पातळ वाटू नका. घट्टसर ठेवलं तर वडे चांगले खरपूस होतात.

coconut vade recipe

वडे खरपुस तळा

तयार पिठाचे गोळे करून वडे थापावेत व छान खरपूस तळावेत. त्याने ते वरुन कुरकुरीत आणि आतून मऊ लागतात.

coconut vade recipe

चटणीसोबत सर्व्ह करा

तुम्ही तयार केलेले हे वडे नारळाची, लसूण-शेंगदाण्याची किंवा हिरव्या मिरचीची चटणीसोबत सर्व्ह करा.

coconut vade recipe

NEXT: Valentines Day Husband Gifts : नवऱ्याला द्या अंगठीच्या 'या' डिझाईन्सच्या भेट वस्तू, व्हेलेंटाईन होईल खास

png jewellers
येथे क्लिक करा