शेवग्याच्या शेंगाचा कुरकुरीत डोसा कधी खाल्लाय का? घरच्या घरी बनवा ही हेल्दी रेसिपी

Manasvi Choudhary

शेवगा

शेवगा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात. शेवग्याच्या पानांची भाजी, सूप आणि आमटी केली जाते पण तुम्ही कधी शेवग्याच्या शेंगाचा डोसा खाल्ल्याय का?

Drumstick | yandex

नाश्त्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन

शेवग्याच्या शेंगाचा डोसा सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी आणि टेस्टी पदार्थ आहे. शेवग्यामध्ये कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन्स असतात.

Drumstick | yandex

शेवग्याच्या शेंगाचा डोसा कसा बनवायचा?

शेवग्याच्या शेंगाचा डोसा बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवू शकता.

Dosa | yandex

साहित्य

शेवग्याच्या शेंगा, हळद, मीठ, रवा, तांदळाचे पीठ, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल मसाला, धना पावडर, जिरा पावडर, काळी मिरी पावडर, हिंग, मीठ, तेल हे साहित्य एकत्र करा.

Drumstick | yandex

शेंगा स्वच्छ धुवून घ्या

शेवग्याच्या शेंगा डोसा बनवण्यासाठी शेंगांची साल काढून तुकडे करून स्वच्छ धुऊन घ्या. नंतर कुकरमध्ये शेंगांचे तुकडे, हळद, मीठ, थोडेसे पाणी घालून शिजवून घ्या.

Crispy Drumstick Dosa | yandex

पेस्ट करून घ्या

त्यानंतर मिक्सरमध्ये आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट करून घ्या. नंतर त्यात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून मिक्स करा.

Crispy Drumstick Dosa

मिश्रण व्यवस्थित मिक्स करा

एका मोठ्या बाऊलमध्ये शेंगा घ्या. शेंगा चमच्याने मॅश करून घ्या. त्यात आलं,लसूण,मिरचीची पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करून घेणे.

Crispy Drumstick Dosa

मिश्रण मिक्स करा

बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेणे. बारीक रवा व तांदळाचे पीठ घालून घेणे.

Crispy Dosa

मसाले मिक्स करा

मिश्रणात चवीप्रमाणे मीठ घाला नंतर त्यात दही घालून मसाले मिक्स करा. गॅसवर गरम तव्यावर मिश्रण पसरवून गरमा गरम डोसे तयार करा

Crispy Dosa

NEXT: पावसाळ्यात नारळ पाणी प्यावं की नाही?

Monsoon Coconut Water Drink
येथे क्लिक करा..