Manasvi Choudhary
आज सर्वत्र 31st च्या पार्टीची धामधूम सुरू आहे.
31st प्रत्येकाच्या घरी नॉन व्हेजचा बेत केला जातो.
आज आम्ही तुम्हाला क्रिस्पी चिकन पकोडे रेसिपी सांगणार आहोत.
चिकन क्रिस्पी पकोडे बनवण्यासाठी बोनलेस चिकन, लिंबाचा रस, आले- लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, जिरा पावडर, कॉनफ्लोर, तांदूळ पीठ, अंड, हिरवी मिरची, मीठ, तेल हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्या. एका भांड्यात चिकन पीस घेऊन त्यात लिंबाचा रस आणि मीठ घालून चांगले मॅरीनेट करा.
नंतर एका वाटीमध्ये कॉनफ्लोर, तांदळाचे पीठ, अंड, आले- लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर घालून मिश्रण एकजीव करा.
नंतर यामध्ये चवीनुसार, चिकन फ्राय मसाला, जीरा पावडर, हळद पावडर, मीठ लावून चिकन मॅरीनेट करण्यासाठी बाजूला ठेवा.
गॅसवर कढईत गरम तेलामध्ये मॅरीनेट चिकन पीस एक एक करून सोडा. ब्राऊन रंग येईपर्यत चीकन फ्राय करून घ्या म्हणजे ते क्रिस्पी होतात.
अशाप्रकारे तयार चिकनवर आवडत असल्यास लिंबू पिळून सर्व्ह करा.