Credit Card Tips: क्रेडिट कार्डवरील छुपे चार्जेस खिसा रिकामा करतील, नुकसान टाळण्यासाठी माहिती ठेवा

साम टिव्ही ब्युरो

क्रेडिट कार्डमुळे पैसे नसतानाही खरेदी करण्याची सुविधा मिळते. मात्र क्रेडिट कार्ड वापरताना अनेक चार्ज असतात जे अनेकांना माहिती नसतात.

ATM Card | Saam TV

क्रेडिट कार्डवरील व्याज, उशीरा पेमेंट आणि प्रक्रिया शुल्क याशिवाय अनेक चार्जेस आकारले जातात, जे तुम्हाला माहित असले पाहिजे.

Credit Card | Saam TV

जर तुम्ही नकळत त्याचा वापर केला तर तुमचे मोठे नुकसानही होऊ शकते किंवा तुमचा खिसा रिकामा होऊ शकतो.

Credit Card | Saam TV

अनेक कंपन्या क्रेडिट कार्डसाठी मेंटेनन्स चार्ज आकारतात. हे चार्ज वार्षिक असू शकते. तुम्ही त्याची तुलना इतर अनेक कंपन्यांच्या कार्डशी करू शकता.

Credit Card | Saam TV

क्रेडिट कार्डच्या मदतीने तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकता. यासाठी तुमच्याकडून चार्जेस आकारले जातात. त्यामुळे तुम्ही क्रेडिट कार्ड वापरताना रोख रक्कम न काढण्याचा प्रयत्न करावा.

Credit Card | Saam TV

क्रेडिट कार्डचा हप्ता उशिरा भरल्यास शुल्क आकारले जाते किंवा त्याऐवजी दंड आकारला जातो. त्यामुळे हप्ता वेळेवर भरावा.

Credit Card | Saam TV

सर्व क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 18% GST आकारला जातो.

Credit Card | Saam TV

क्रेडिट कार्डच्या साहाय्याने परदेशात पैसे पाठवण्यासाठी खूप पैसे आकारले जातात. हे शुल्क ट्रान्सभर केलेल्या रकमेच्या 1% किंवा अधिक असू शकते.

Credit Card | Saam TV

NEXT: ब्लॅक फिटेड ड्रेसमध्ये नोराचा जलवा; हटके पोजवर चाहते फिदा

Nora Fatehi | Nora Fatehi