Shraddha Thik
बदलते हवामान लहान मुले आणि प्रौढांसाठी आव्हानात्मक असू शकते. विशेषतः हिवाळ्यात खोकला, सर्दी, ताप येऊ शकतो.
काहीवेळा संसर्ग इतका वाढतो की श्वसनमार्गामध्ये सूज येण्याची समस्या सुरु होते, त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.
जवळ येत असलेल्या सर्दीमुळे तुमची झोप उडू नये म्हणून आम्ही तुम्हाला काही घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे खोकला आणि सर्दीपासून आराम मिळेल.
आयुर्वेदातही काळी मिरी खूप महत्त्वाची मानली जाते. या स्वयंपाकघरातील मसाल्यामध्ये पाइपटिन असते, जे कफ काढून टाकते.
कफ, सदर्दी, खोकला आणि खोकला बरा करण्यासाठी दालचिनी शक्तिशाली औषधाप्रमाणे काम करते. यामुळे खोकल्यापासून आराम मिळतो.
लवंगामध्ये युजेनॉल नावाचे एक संयुग असते, ज्यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक- विरोधी गुणधर्म असतात. खोकल्यावर लवंग चावा.
छोटी वेलची म्हणजे गुणांचे भांडार. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मासोबतच कफ दूर करण्याचे गुणधर्म देखील आहेत. सर्दी आणि खोकल्यासाठी वेलची चावून खावी.