ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सर्व भाज्यांची चव वाढवणारी कोथिंबीरचा भाव सध्या गगनाला भिडला आहे.
पावसाच्या संततधारेमुळे बाजारात पालेभाज्यांची आवक घटली असून किंमतीवर परिणाम झालेला आहे.
मुंबईमध्ये कोथिंबीर २०० रुपये गड्डी विकल्या जात आहेत.
अमरावतीमध्ये ४०० रुपये गड्डी कोथिंबीर विकल्या जात आहेत.
गावठी कोथिंबीर सर्वाधिक ४५० रुपये जुडी भाव मिळत आहेत.
कोथिंबीरसह इतरही पालेभाज्यांच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झालेली आहे.
कोथिंबीरप्रमाणे मेथी प्रती जुडी २० ते २५० रुपयांनी मिळताना दिसून येत आहे.