Sakshi Sunil Jadhav
स्वयंपाकघरात तांब्याची भांडी वापरण्याची परंपरा आजही आपल्याला पाहायला मिळते. पण वापरानंतर या भांड्यांवर काळे किंवा हिरवे डाग दिसतात. हे डाग काढण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय पुढील लेखात दिले आहेत.
लिंबाचा रस आणि मीठ एकत्र करून भांड्यावर चोळा. काही मिनिटांनी धुवून टाका. तांब्याच्या भांड्यांवरचे डाग सहज निघून जातील.
व्हिनेगरमध्ये मीठ मिक्स करून पेस्ट तयार करा आणि तांब्याच्या भांड्यावर लावा. याने काळे डाग निघून जातील.
चिंच भिजवून त्याचा लगदा भांड्यावर चोळला. त्याने तांब्याची भांडी चमकून निघतात.
बेकिंग सोड्यात थोडं पाणी घालून पेस्ट बनवा आणि हलक्या हाताने भांडं धुवून घ्या.
टोमॅटोतील आम्लामुळे डाग कमी होतात. केचप लावून 10 मिनिटांनी तुम्ही तांब्याची भांडी धुवून घ्या. मग साबणाने पुन्हा धुवा.
गव्हाच्या पिठात मीठ आणि थोडं व्हिनेगर घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट डाग काढण्यासाठी उपयोगी ठरू शकते.
तुम्ही जेव्हा तांब्याची भांडी धुता तेव्हा ती स्वच्छ करताना गरम पाण्याचा वापर करा.
तांब्याची भांडी खूप जोरात घासू नका. त्यामुळे त्यावर स्क्रॅच पडू शकतात. नियमित साफसफाई केल्यास भांडी नेहमी नवीनसारखी दिसतील.