साम टिव्ही ब्युरो
हवामानातील बदलामुळे आरोग्यावर परिणाम होतो.
बदलत्या ऋतूमुळे हिवाळ्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
थंडीच्या दिवसात घसा खवखवणे, सर्दी, खोकला, शिंका येणे यासारख्या समस्या उद्भवतात.
सर्दी आणि खोकला झाल्यास तुम्ही घरगुती उपाय देखील करू शकता.
आल्याचा गरमागरम चहा पिल्याने सर्दीपासून बचाव होतो.
मध हे आर्युवैदिक व गुणकारी आहे.
एक चमचा मधाचे सेवन केल्यास घसादुखी आणि सर्दीपासून आराम मिळतो.
मध कफ साफ करण्यास मदत करते.
हळदीचे दूध प्यायल्याने जळजळ, सर्दी यापासून आराम मिळतो.