Shruti Vilas Kadam
कॉफीमध्ये कॅफीन असते आणि त्याचा शरीरावर सौम्य डाययुरेटिक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लघवीचे प्रमाण वाढू शकते. मात्र, मर्यादित प्रमाणात कॉफी प्यायल्याने शरीरातील एकूण पाण्याच्या पातळीत महत्त्वपूर्ण घट होत नाही.
कॉफी प्यायल्यानंतर लघवी जास्त होऊ शकते, मात्र याचा अर्थ शरीरातील पाण्याची कमतरता झालीच असे नाही. नियमित कॉफी पिणाऱ्या व्यक्तींमध्ये मर्यादित सेवनाने हायड्रेशनवर मोठा परिणाम होत नसल्याचे संशोधनात आढळले आहे.
डॉक्टरांच्या मते दिवसाला सुमारे ३५० ते ४०० मिलीग्रॅम कॅफीन सुरक्षित मानले जाऊ शकते. हे साधारण ३ कप कॉफीच्या आसपास असू शकते. मात्र, कॉफीतील कॅफीनचे प्रमाण प्रकार आणि कपाच्या आकारानुसार बदलते.
दिवसाला ५०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त कॅफीन म्हणजे साधारण ४ किंवा त्याहून अधिक मोठे कप कॉफी घेतल्यास शरीरातील द्रवपदार्थांचे संतुलन बिघडण्याचा धोका वाढू शकतो.
कॉफीचे अतिसेवन केल्यास डोकेदुखी आणि झोप न येण्यासारख्या समस्या जाणवू शकतात. त्यामुळे कॉफीचे सेवन मर्यादित ठेवणे योग्य ठरते.
ज्यांना सतत उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, पोटाशी संबंधित गंभीर समस्या आहेत किंवा झोपेच्या गोळ्या घेतात, त्यांनी कॉफीचे सेवन टाळावे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मर्यादित प्रमाणात कॉफी प्यायल्याने डिहायड्रेशनचा धोका मोठा नसला तरी दिवसभर पुरेसे साधे पाणी पिणे महत्त्वाचे आहे. कॉफीला पाण्याचा पर्याय समजू नका.