Dhanshri Shintre
घराच्या भेगा आणि फटी बंद करा, दरवाजे, खिडक्या आणि भिंतीतील भेगा सील करून घ्या.
घराच्या भोवतालचं परिसर स्वच्छ ठेवा, पालापाचोळा, कचरा, पाणी साठू देऊ नका.
साप, माशी आणि डास यांचा प्रवेश रोखण्यासाठी जाळ्या लावणं उपयुक्त.
घरात उघडं अन्न ठेवू नका, उघडं अन्न झुरळं, मुंग्या आणि उंदीरांना आकर्षित करतं.
ओल्या कपड्यांचा ढिगारा करू नका, साप आणि कीटक ओलसर ठिकाणी लपतात.
नियमित झाडलोट आणि पाण्याचा निचरा तपासा, आंगणात किंवा गटारात पाणी साचल्यास कीटकांची उत्पत्ती होते.
कडुलिंबाचं पाणी किंवा लिंबूचा उपाय वापरा हे नैसर्गिक कीटकनाशक म्हणून काम करतात.
प्रवेशद्वाराजवळ मीठ किंवा भुईराज ठेवा साप घरात येऊ नयेत म्हणून हा पारंपरिक उपाय वापरा.