Akshay Baisane | अक्षय बैसाणे
चुआंडो टॅन सिंगापूरचा मॉडेल आणि फोटोग्राफर त्याच्या लुकसाठी लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
अतिशय आकर्षक आणि बोल्ड लुकमुळे तो जगभरात चर्चेत आला आहे.
अनेकांनी चुआंडोचं वय २० ते २५ असल्याचा अंदाज लावला, पण सगळ्यांचाच अंदाज चुकत आहे.
आता आम्ही तुम्हाला चुआंडो याचं खरं वय सांगणार आहोत, ज्याने तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
चुआंडो टॅनचा जन्म 1967 मध्ये झाला, म्हणजे त्याचं वय आता तब्बल 55 वर्षं झालं आहे.
होय! चुआंडोचं वय तब्बल 55 वर्षं झालं आहे. परंतु त्याचा फिटनेस त्याने इतका चांगला राखला आहे की तो केवळ 20 वर्षांचा दिसतो.
चुआंडो टॅनने 1980 च्या दशकात मॉडेल म्हणून काम केले, 90 च्या दशकात तो एक पॉप गायक देखील होता.
चुआंडो टॅनने पहिल्यांदा मीडियाचे लक्ष वेधून घेतले जेव्हा 2017 मध्ये, एका चिनी वृत्तसंस्थेने चुआंडोवर एक व्हायरल कथा दाखवली.
चुआंडो टॅनने 2019 मध्ये 'प्रिशियस इज द नाईट'मधून अभिनयात पदार्पण केले. सध्या टॅनचे इन्स्टाग्रामवर 1.2 दशलक्ष फॉलोअर्स आहेत आणि त्याने आजपर्यंत 626 पोस्ट केल्या आहेत.
चुआंडो टॅनचा विश्वास आहे की त्याचे 70 टक्के दिसणे हे खाल्लेल्या अन्नावर आणि 30 टक्के व्यायामावर आधारित आहे.
तो धूम्रपान करत नाही, दारू पीत नाही आणि रात्रीच्या जेवणासाठी ताज्या हिरव्या भाज्यांनी बनवलेले सॅलड खातो. @chuando_chuandoandfrey या नावाने तो इन्स्टाग्रामवर आहे.