Sakshi Sunil Jadhav
ख्रिसमसला पारंपरिक फ्रुट केकऐवजी बनवले जाणारे हे छोटे बॉल्स चवीला खूपच स्वादिष्ट असतात. कमी वेळात तयार होतात आणि साठवायलाही सोपे असतात.
फ्रुट केकचे तुकडे 2 कप, कंडेन्स्ड मिल्क 3 ते 4 टेबलस्पून, ड्रायफ्रूट्स, कोको पावडर, व्हॅनिला एसेंस 2 थेंब इतक्याच साहित्यात तुम्ही घरगुती फ्रुट केक बॉल्स बनवला जातो.
फ्रुट केक वापरू शकता किंवा उरलेला केक हाताने चुरून बारिक करू शकता. गाठी ठेवू नका.
चुरलेला केक, कंडेन्स्ड मिल्क, ड्रायफ्रूट्स आणि व्हॅनिला एसेंस एकत्र करून मऊ मिश्रण तयार करा.
हाताला थोडं तूप लावून मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे तयार करा. तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता.
तयार बॉल्स कोको पावडर किंवा डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवून घ्या. यामुळे चव आणि लूक दोन्ही वाढतात.
बॉल्स 20 ते 30 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे ते व्यवस्थित सेट होतील.
कंडेन्स्ड मिल्क जास्त घातल्यास बॉल्स खूप मऊ होतात. मुलांसाठी बनवत असाल तर अल्कोहोल टाळा.