Shraddha Thik
मुंबई शहर स्वप्नांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. ग्लॅमर, आकर्षक जीवनशैली आणि आधुनिकतेसाठी मुंबई हे जगभर प्रसिद्ध शहर मानले जाते.
मुंबईत अशी अनेक सुंदर आणि मनमोहक ठिकाणे आहेत, जी पाहण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येतात.
मुंबईतील बऱ्याच ठिकाणी गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी तसेच ख्रिसमस किंवा नवीन वर्ष असे अनेक सण साजरे केले जातात. त्यामुळे मुंबईत प्रचंड गर्दी असते.
दक्षिण मुंबईत या चर्चच्या आसपास ख्रिसमसच्या दिवशी लोक चर्चला भेट देण्यासाठी तसेच येथील सजावट पाहण्यास येतात. ख्रिसमसच्या काही दिवस आधी या चर्चच्या आजूबाजूची ठिकाणे दिवे लावून सजवली जातात.
या सणानिमित्त मुंबईतील बांद्रा येथे मध्यरात्री मोठ्या संख्येने लोक तेथील आकर्षक सजावट पाहायला आणि फोटो काढायला येतात.
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने लाखो देशी-विदेशी पर्यटक येथे येतात. जुहू चौपाटीवर रात्री उशिरापर्यंत संगीताचा कार्यक्रम आणि पार्टीचे वातावरण असते.
त्यामुळे यंदा तुम्ही ख्रिसमसनिमित्त बाहेर पार्टीसाठी जाण्याचा विचार करत असाल तर जुहू चौपाटी तुमच्यासाठी बेस्ट ठिकाण ठरू शकतं.