Manasvi Choudhary
घरी नाश्त्याला सकाळी इडली, मेदूवडा, आप्पे बनवले जातात.
आप्पे घरी करण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
आज आम्ही तुम्हाला चॉकलेटचे आप्पे कसे बनवायचे सांगणार आहोत.
चॉकलेटचे आप्पे बनवण्यासाठी तांदूळ,चॉकलेट क्रिम, बेकिंग सोडा, कोको पावडर, उडीद डाळ, पोहे, साखर, वेलची, तेल हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम एका भांड्यात तांदूळ, डाळ भिजवून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
हे मिश्रण ७ ते ८ तास आंबवण्यासाठी ठेवा. नंतर या मिश्रणात कोको पावडर,साखर,चॉकलेट क्रिम आणि वेलची पूड घालून चांगले परतून घ्या.
साखर पूर्णपणे विरघळली आहे का ते पहावे. नंतर गॅसवर आप्पे पात्र गरम झाल्यावर तेलाचा हात फिरवून हे मिश्रण सोडा.
झाकण ठेवून वाफ येऊ द्या.आप्पे दोन्ही बाजूंनी चांगते खरपूस भाजून घ्या.
तयार आप्पे चॉकलेट सॉससोबत खाण्यासाठी सर्व्ह करावेत.