Manasvi Choudhary
वजन कमी करण्यासाठी चिवडा की मुरमुरा कोणता स्नॅक अधिक चांगला आहे ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
मुरमुऱ्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण अत्यंत कमी असते. तुम्ही वाटीभर मुरमुरा खाल्ला तरी शरीरात जास्त कॅलरीज जात नाहीत.
मुरमुरा पचायला हलका असतो. त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते पण चरबी वाढत नाही.
जर तुम्ही मुरमुरा साध्या पद्धतीने म्हणजेच तेल न घालता कमी तेलात हळद आणि जिऱ्यामध्ये फ्राय करून खाल्ले तर ते आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
बाजारात मिळणारा किंवा घरी बनवलेला चिवडा वेगवेगळा असतो. .
चिवड्यामध्ये फॅट्स आणि कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे, जर तुम्ही तो प्रमाणापेक्षा जास्त खाल्ला, तर वजन कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता अधिक असते.
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर तळलेल्या चिवड्यापेक्षा साधा, भाजलेला मुरमुरा खाणे फायदेशीर आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.