Child Mobile Addiction : सुट्ट्यांमध्ये मुलं दिवसभर मोबाइल वापरतात? सावधान! होतील 'या' ५ गंभीर समस्या

Shreya Maskar

डोळ्यांचे आरोग्य

मुलांच्या मोबाइल फोनच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर अतिरिक्त ताण येतो. लहान स्क्रीनकडे बराच वेळ एक टक लावून पाहिल्याने डोळ्यांना थकवा जाणवतो आणि अस्वस्थ वाटते.

Eye Health | pinterest

कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम

मोबाईलमधून येणारा निळा प्रकाश डिजिटल आयस्ट्रेन (Digital eye strai- 'कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम' ) देखील निर्माण करू शकतो. ज्यामुळे डोळे कोरडे होणे, दृष्टी धूसर होणे आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात.

Computer Vision Syndrome | pinterest

निद्रानाश

मुलांमध्ये मोबाइल फोनच्या वापराचा झोपेच्या चक्रावर परिणाम होतो. मोबाईल स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश (Blue Light) शरीरातील मेलाटोनिन (Melatonin) या संप्रेरकाचे (Hormone) उत्पादन थांबवतो. मेलाटोनिन हे हार्मोन शरीराला शांत आणि झोप येण्यासाठी आवश्यक असते. यामुळे मेंदूला दिवस असल्याची जाणीव होते आणि झोप येत नाही.

Insomnia | pinterest

शारीरिक आरोग्याच्या समस्या

स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवल्यामुळे शारीरिक हालचालींसाठी कमी वाव मिळतो. बैठी जीवनशैली वाढते आणि लठ्ठपणा येतो. हृदयरोग आणि स्नायू , हाडांच्या समस्यांचा धोका वाढतो.

Physical Health Issues | pinterest

रेडिओ फ्रिक्वेन्सी

मोबाईल फोन रेडिओ फ्रिक्वेन्सी (RF) इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन उत्सर्जित करतात, जे अ-आयनीकरण (non-ionizing) प्रकारचे असते. शरीराच्या उती या लहरी शोषून घेतात, ज्यामुळे मुख्यत्वे उष्णता निर्माण होते. याचा मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो. कर्करोगाचा धोका वाढतो.

Radio Frequencies | pinterest

बौद्धिक विकास खुंटतो

मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे मुलांच्या बौद्धिक विकासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. स्क्रीनवर जास्त वेळ घालवल्याने त्यांच्यातील शोधकवृत्ती, सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याच्या संधी मर्यादित होऊ शकतात. तसेच मल्टीटास्किंग थांबते. एकाग्रता, स्मरणशक्ती आणि एकूणच बौद्धिक क्षमता कमी होऊ शकते.

Intellectual Development | pinterest

मानसिक आरोग्य

मुलांचा मोबाइल फोनचा अतिवापर हा मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होतो. ज्यामध्ये नैराश्य, चिंता, कमी झालेला आत्मसन्मान आणि सामाजिक-भावनिक समस्यांचा वाढता धोका यांचा समावेश आहे.

Mental Health | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

disclaimer | pinterest

NEXT : फक्त महिन्यात मुलांची पर्सनालिटी बदलेल, उन्हाळ्याच्या सुट्टीत शिकवा 'ही' ५ कौशल्ये

Parenting Tips | google
येथे क्लिक करा...