कोमल दामुद्रे
जायफळ हा मसाला चवीसाठी व सुंगंधासाठी भरपूर प्रमाणात ओळखला जातो. याचा वापर पदार्थाची चव वाढवण्यासाठी केला जातो.
परंतु, जायफळचे अनेक फायदे आहेत. लहान मुलांना जायफळचे काही अंश खाऊ घातले तर त्यांचे अनेक आजारांपासून रक्षण होऊ शकते.
मुलांना भूक लागत नसेल तर दूधात जायफळची पूड मिक्स करुन त्यांना पिण्यास द्या. रोगप्रतिकारशक्ती सोबत भूक ही वाढेल
लहान मुलांच्या दुधाच्या बाटली जायफळ पूडचे काही कण टाकल्याने बाळाला शांत झोप लागते. तसेच पोटाच्या अनेक समस्यांपासून बचावही होतो.
मुलांना तोंडात फोड आले असल्यास जायफळ व खडीसाखर खाऊ घालावी. याने आराम मिळू शकतो.
जायफळमध्ये असणारे गुणधर्म ऋतूमानानुसार होणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी फायदेशीर असतात. तसेच मधात जायफळ मिक्स करुन खाल्ल्याने सर्दी-खोकल्यासारख्या आजरांवर आराम मिळतो.
मुलांची पचनसंस्था बिघडल्यावर किंवा पोटात दुखी, गॅसेचा त्रास झाल्यावर जायफळ खाऊ घालावी.
मुलांचा कान दुखू लागल्यावर किंवा कानाला सूज आल्यानंतर जायफळची पेस्ट बनवून कानाजवळ लावल्यास फायदा होतो.