Shivani Tichkule
'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका विशेष लोकप्रिय झाली होती.
या मालिकेने अल्पावधीच प्रेक्षकांचे मन जिंकले.
या मालिकेत सर्वाधिक प्रेम मिळाले ते परी कामत अर्थात बालकलाकार मायरा वायकुळला.
मालिका संपल्यानंतरही मायरा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी जोडलेली होती.
आता मायराच्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे.
सर्वांच्या लाडक्या परीला आता पुन्हा एकदा टीव्हीवर पाहता येणार आहे.
मायरा यावेळी मराठी नव्हे तर हिंदीत काम करताना दिसेल.
मायराच्या नव्या मालिकेचं नाव 'नीरजा: एक नयी पहचान' असं आहे.
या मालिकेत परीचा लूक मात्र पूर्णपणे बदलला आहे.