साम टिव्ही ब्युरो
टेलिव्हिजन क्षेत्रातील बालकलाकार त्यांच्या लूक, डान्स आणि अभिनयाने चर्चेत असतात.
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील लक्ष्मी म्हणजे सायशी साळवी.
सायशाने मालिकेतील लक्ष्मीच्या रूपाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सोशल मीडियावर सायशाचा मोठा चाहतावर्ग आहे.
सायशा तिचे फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
हल्लीच सायशाने मकरसंक्राती स्पेशल लूक कॅरी केला आहे.
काळ्या रंगाच्या खणाच्या साडीत सायशाने हटके स्टाईलमध्ये फोटोशूट केलं आहे.
सायशाने ऑक्सिडाइज ज्वेलरीसह हेअरस्टाईल केली आहे. ज्यामध्ये चिमुकली सायशा अप्रतिम दिसत आहे.
चिमुकल्या सायशाच्याया फोंटोवर तूफान लाईक्स येत आहेत.