Vidarbha Tourism: विदर्भातील ‘मिनी काश्मीर’! चिखलदऱ्यातील ही 8 ठिकाणे पाहिली नाहीत तर खूप काही मिस कराल

Sakshi Sunil Jadhav

विदर्भातील प्रसिद्ध ठिकाण

विदर्भातील एकमेव हिल स्टेशन म्हणून ओळखलं जाणारं चिखलदरा (Chikhaldara) हे निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच आहे. धुक्याने भरलेली दऱ्या, हिरवाई आणि थंड हवामानामुळे ईथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते.

Chikhaldara tourism guide

भीमकुंड

महाभारतातल्या भीमाशी संबंधित मानलं जाणारं हे ठिकाण खोल दरीसाठी प्रसिद्ध आहे. ईथून तुम्हाला हिरवंगार दृश्य आणि धुकं पाहायला मिळतं.

chikhaldara trip

सनसेट पॉइंट

संध्याकाळी सूर्यास्त पाहण्यासाठी हे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. लाल-केशरी रंगांनी भरलेलं आकाश आणि शांत वातावरण तुम्हाला इथे अनुभवता येईल.

mini kashmir of vidarbha

मेळघाट व्याघ्र प्रकल्प

वन्यजीव प्रेमींसाठी हे अभयारण्य खास आकर्षण आहे. इथे वाघ, बिबट्या आणि विविध पक्षी प्रजाती पाहायला मिळतात.

chikhaldara hill station

पाचबोल पॉइंट

तुम्हाला या ठिकाणी तुमचा आवाज पाच वेळा प्रतिध्वनी होऊन ऐकायला येतो. म्हणूनच हे ठिकाण खास आहे.

chikhaldara wildlife

गाविलगड किल्ला

इतिहासप्रेमींसाठी हे किल्ला आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. ईथून दिसणारं निसर्गाचं दृश्य आणि प्राचीन वास्तू खास अनुभव देतात.

chikhaldara forest

देवी पॉइंट

शांत आणि रमणीय वातावरणासाठी ओळखले जाणारं हे ठिकाण पर्यटकांना भुरळ घालतं. हिरवाईने नटलेली दरी आणि थंड वारा मन प्रसन्न करतो.

chikhaldara eco tourism

मोझरी पॉइंट

सकाळच्या सूर्योदयासाठी हे ठिकाण खास मानलं जातं. ईथून दिसणारं धुकं आणि पर्वतरांगाचे दृश्य पाहायला मिळेल.

chikhaldara maharashtra

नर्नाळा किल्ला

चिखलदऱ्याजवळील ऐतिहासिक किल्ला म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. किल्ल्याची भव्य रचना आणि परिसरातील निसर्ग पर्यटकांना आकर्षित करतो.

chikhaldara maharashtra

NEXT: Bad Habits: आयुष्याचं वाटोळं करणाऱ्या या ६ सवयी आत्ताच सोडा

success habits
येथे क्लिक करा