Manasvi Choudhary
फॅशनच्या जगात चिकनकारी कुर्ती कायमच ट्रेंडमध्ये असतात. या कुर्तीचे कापड सुती असल्याने लूक एकदम रिच दिसतो.
जर तुम्हालाही तुमच्या डेलीवेअर किंवा ऑफिस रुटीनसाठी नवीन आणि ट्रेंडी कुर्ती पाहिजे असतील तर तुम्ही चिकनकारी कुर्ती निवडा.
जॉर्जेट फॅब्रिकमधील लखनवी कुर्ती खूप सुंदर दिसते. या कुर्तीच्या गळ्याभोवती नाजूक आणि बारीक एम्ब्रॉयडरी असते त्यामुळे कुर्तीचे हे पॅटर्न रिच लूक देते. अनेक तरूण मुली ऑफिस आणि डेलीवेअरसाठी ही कुर्ती निवडतात.
तुम्हाला जर रॉयल आणि क्लासिक लूक हवा असेल, तर अस्सल हँड एम्ब्रॉयडरी लखनवी कुर्ती तुम्ही निवडू शकता. गोल गळ्याच्या डिझाईनमध्ये येणाऱ्या या कुर्तीवर केलेली बारीक नक्षी लक्ष अधिक उठून दिसते.
तुम्हाला जर थोडा ट्रेंडी आणि इंडो-वेस्टर्न लुक हवा असेल, तर घेरदार कॉटन चिकनकारी कुर्ती नक्की ट्राय करा. या प्रकारच्या कुर्तीवर तुम्ही सिम्पल लेगीज किंवा डेनिम जिन्स घालू शकता.
स्टायलिश लूकसाठी ‘व्ही-नेक शॉर्ट कुर्ती’ तुम्ही निवडू शकता. ऑफिस किंवा कॉलेजला जाणाऱ्या मुलींसाठी- डेलीवेअरसाठी हा पॅटर्न अत्यंत क्लासी दिसतो.
हँडमेड चिकनकारी कुर्ती कायमच ट्रेंडमध्ये असते. या कुर्तीची फॅशन कधीच कमी होत नाही. पूर्णपणे हाताने विणलेल्या आणि विविध आकर्षक रंगांमध्ये या कुर्ती असतात.