Cheese Ball Recipe: लहान मुलांसाठी झटपट बनवा कुरकुरीत आणि चीजने भरलेले चीज बॉल्स, वाचा रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार करा

चीज बॉल्ससाठी उकडलेले बटाटे, मोझरेला किंवा प्रोसेस्ड चीज, कॉर्नफ्लोअर, ब्रेडक्रम्स, हिरवी मिरची, कोथिंबीर, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स आणि चवीनुसार मीठ घ्या.

Crispy Cheese Balls | ai

बटाट्याचे मिश्रण तयार करा

उकडलेले बटाटे चांगले मॅश करून त्यात कॉर्नफ्लोअर, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ घाला. सर्व साहित्य एकजीव करून मऊ मिश्रण तयार करा.

Coriander Cheese Ball | GOOGLE

चीजचे छोटे तुकडे करा

मोझरेला किंवा प्रोसेस्ड चीजचे छोटे चौकोनी तुकडे करून घ्या. चीजचे तुकडे फार मोठे ठेवू नका, जेणेकरून बॉल्स व्यवस्थित बंद करता येतील.

Cheese Ball Recipe | GOOGLE

चीज बॉल्स तयार करा

बटाट्याच्या मिश्रणाचा छोटा गोळा हातात घेऊन तो थोडा चपटा करा. मध्यभागी चीजचा तुकडा ठेवून मिश्रण सर्व बाजूंनी बंद करा आणि गोल आकार द्या.

Cheese Ball | pinterest

ब्रेडक्रम्समध्ये कोटिंग करा

तयार केलेले बॉल्स कॉर्नफ्लोअरच्या पातळ मिश्रणात हलके बुडवून ब्रेडक्रम्समध्ये घोळवा. अधिक कुरकुरीत टेक्सचरसाठी पुन्हा एकदा कोटिंग करू शकता.

Cheese Ball | pinterest

चीज बॉल्स तळून घ्या

कढईत तेल गरम करून चीज बॉल्स मध्यम आचेवर तळा. बॉल्स हलके सोनेरी आणि कुरकुरीत झाले की ते तेलातून बाहेर काढा.

Cheese Ball | pinterest

गरमागरम सर्व्ह करा

तयार चीज बॉल्स गरमागरम टोमॅटो केचप, मेयोनीज किंवा तुमच्या आवडत्या डिपसोबत सर्व्ह करा. बाहेरून कुरकुरीत आणि आतून वितळलेल्या चीजचा स्वाद अप्रतिम लागतो.

Cheese Ball | yandex

Skin Care: ऑयली, ड्राय की कॉम्बिनेशन स्किन? तुमच्या त्वचेसाठी कोणता फेसवॉश आहे बेस्ट, जाणून घ्या

Skin Care | Saam Tv
येथे क्लिक करा