ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
क्लाऊड किचन
क्लाउड कीचन ही संकल्पना भारतात खूप वेगाने वाढत आहे. Swiggy, Zomato यांवरून अनेक जण ऑनलाईन ऑर्डर्स करत असल्याने या व्यवसायाला चांगला वाव आहे.
होम बेकरी
लॉकडाऊनमध्ये अशा प्रकारच्या व्यवसायांचा प्रचंड फायदा झाला. तुम्ही होम बेकरीचा व्यवसाय सुरु करण्यासोबतच याचे क्लासेस सुध्दा घेऊ शकता.
टिफीन सर्विस
तुमच्या area मध्ये जर कॉलेजेस, हॉटेल्स असतील किंवा कारखाने, कॉर्पोरेट ऑफिसेस असतील तर हा व्यवसाय करून तुम्हाला खूप फायदा होईल.
Customized Gifts
हा व्यवसाय सुरु करुन जर तुम्ही जर फेसबुक, इंस्टाग्रामचा प्रभावी वापर केला, तर तुम्हाला सतत ऑर्डर्स येत राहतील. फक्त सुरुवातीला थोडा संयम बाळगावा लागेल.
ऑनलाईन कोचिंग
तुम्ही ज्या विषयात एक्स्पर्ट आहात, त्याच्याशी संबधित तुम्ही ऑनलाइन कोचिंग सुध्दा सुरु करु शकता. बरेच जण योगा, मेडीटेशनचे क्लासेस सुध्दा ऑनलाईन घेतात.
ऑरगॅनिक शेती
जर तुमच्याकडे पुरेशी जागा असेल, तर तुम्ही प्रायोगिक तत्त्वावर ऑरगॅनिक शेती करू शकता. यासाठी तुम्हाला थोड प्रशिक्षण घ्यावं लागेल. येत्या काळात औरंगनिक प्रॉडक्ट्सची डिमांड प्रचंड प्रमाणात वाढणार आहे.
हे सोपे व्यवसाय आपण घरीच करू शकतो.