Manasvi Choudhary
चण्याची रस्सा भाजी ही प्रत्येकाकडे एकदा तरी बनवली जाते. चण्याची रस्सा भाजी खायला सर्वानाच आवडते.
चण्याची रस्सा भाजी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही चपाती, भाकरी आणि भातासोबत ही भाजी सर्व्ह करू शकता.
चण्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी चणे, ओला किंवा सुका वटाणा, कांदा, टोमॅटो, आलं - लसूण पेस्ट ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं , तेल, मसाला, हळद, गरम मसाला, जिरे, मोहरी, मीठ, कोथिंबीर हे साहित्य एकत्र करा.
चण्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी भाजलेले खोबरे, लसूण यांचे एकत्र वाटण तयार करा. गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता याची फोडणी द्या
मिश्रणात बारीक चिरलेला कांदा घालून तो गुलाबी होईपर्यंत परता. त्यानंतर आले-लसूण पेस्ट टाका आणि कच्चा वास जाईपर्यंत परता. आता टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत शिजवा.
या मिश्रणात हळद, लाल तिखट, धणे पूड आणि गरम मसाला टाका. मसाला चांगला परतून घ्या नंतर यात बटाटे घालून चणे देखील व्यवस्थित परतून घ्या
भाजी शिजण्यासाठी यात पाणी मिक्स करा आणि चवीनुसार मीठ टाका आणि भाजी व्यवस्थित शिजवून घ्या. भाजी शिजल्यावर कोथिंबीर घाला.