ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू पंचांगानुसार आषाढ हा नववर्षातील चौथा महिना असून या काळात विष्णू आणि सूर्यदेवाची पूजा करून विशिष्ट मंत्रांचा जप केला जातो.
२५ जून २०२५ पासून आषाढ महिन्याला सुरुवात होणार असून या काळात पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा जीवनात येते.
पूजेदरम्यान मंत्रजप केल्याने भक्तीला बळ मिळते, देवांचे आशीर्वाद लाभतात आणि जीवनातील अडथळ्यांपासून संरक्षण मिळते, असे मानले जाते.
आषाढ महिन्यात पूजेनंतर "ॐ श्री प्रकाटाय नमः" किंवा "ॐ श्री वामनाय नमः" हा मंत्र जपल्याने जीवनात यश आणि प्रगतीची वाट खुलते.
आषाढ महिन्यात "ॐ नमो भगवते वासुदेवाय" मंत्राचा नियमित जप केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात यशाच्या नव्या संधी निर्माण होतात.
आषाढ महिन्यात भगवान शंकराची उपासना लाभदायक मानली जाते. "ॐ नमः शिवाय" मंत्राचा जप केल्याने कार्यात यश आणि मानसिक शांती मिळते.
आषाढ महिन्यात गरजूंना मीठ, तांदूळ, गूळ आणि तीळ यांचे दान केल्याने सुख, समृद्धी लाभते आणि जीवनात कधीच अभाव जाणवत नाही.