Shruti Vilas Kadam
गरबा नाईटसाठी मिरर वर्क चनिया चोळी हा आकर्षक पर्याय आहे. ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी, झुमके आणि बांगड्यांसोबत हा लूक अधिक सुंदर दिसतो.
मल्टिकलर लेहेंगा गरब्यासाठी खास ठरतो. लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी आणि निळ्या रंगांच्या छटांमुळे क्लासी लूक मिळतो. साध्या ब्लाउजसोबत रंगीबेरंगी लेहेंगा सुंदर दिसतो.
गुजराती पारंपरिक फॅशन आवडत असल्यास बंधेज प्रिंटची चनिया चोळी निवडा. या प्रिंटमुळे पोशाखाला पारंपरिक आणि देखणा लूक मिळतो.
काळ्या रंगाची चनिया चोळी स्टायलिश आणि उठावदार दिसते. त्यावर चंदेरी किंवा सोनेरी मिरर वर्क, भरतकाम आणि रंगीबेरंगी बॉर्डर असल्यास लूक अधिक आकर्षक होतो.
रॉयल ब्लू रंगाचा लेहेंगा गरबा नाईटसाठी सुंदर पर्याय आहे. त्यावर सोनेरी भरतकाम, मिरर वर्क किंवा गोटा पट्टीची सजावट छान दिसते.
मरून रंगाचा लेहेंगा आणि त्यावरील गोटा पट्टीची सजावट लूकसाठी उत्तम आहे. सोनेरी बॉर्डर, एम्ब्रॉयडरी आणि मॅचिंग चोळी यामुळे पोशाखाला आकर्षक रूप मिळते.
मॉडर्न आणि पारंपरिक फॅशनचा मिलाफ हवा असल्यास इंडो-वेस्टर्न लेहेंगा सेट निवडा. क्रॉप टॉप, कॉर्सेट स्टाइल ब्लाउज किंवा हटके कट असलेली चोळी यासोबत फ्लेअर्ड स्कर्ट छान दिसतो.