Dhanshri Shintre
कुरकुरीत आणि चविष्ट भेंडी बनवण्यासाठी सोपी रेसिपी जाणून घ्या. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही डिश बनवा आणि आपल्या जेवणात स्वादाचा आनंद घ्या.
भेंडी, चण्याचे पीठ, तांदळाचे पीठ, कॉर्नफ्लोअर, लाल तिखट, लिंबाचा रस, हळद, मीठ
भेंडीला मधोमध चार बारीक भागांत चिरा. त्यानंतर एका भांड्यात चिरलेली भेंडी ठेवा. पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक मसाले आणि साहित्य तयार ठेवा.
चिरलेल्या भेंडीमध्ये बेसन, तांदळाचे पीठ, कॉर्न फ्लोअर, लाल तिखट, हळद, मीठ आणि लिंबाचा रस घालून सगळे नीट मिसळा, जेणेकरून भेंडी पूर्णपणे मसाल्याने माखली जाईल.
एका कढईत तेल गरम करा. तेल चांगले गरम झाल्यावर मसाल्यात माखलेले भेंडीचे तुकडे त्यात टाका आणि तळून घ्या.
भेंडी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. नंतर त्यावर चाट मसाला टाका. गरमागरम कुरकुरीत भेंडी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.