Surabhi Jagdish
काही महिन्यांपूर्वीच चांद्रयान-4 मोहिमेला सरकारकडून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यासाठी इस्रोही सज्ज आहे.
हे मिशन पूर्ण करण्यासाठी सरकारने इस्रोला 2104.06 कोटी रुपये मंजूर केलेत. येत्या चार वर्षांत ते सुरू करण्याची योजना आहे.
इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी म्हटलं होतं की, चांद्रयान-4 एकाच वेळी प्रक्षेपित होणार नाही.
हे दोन भागात लॉन्च केलं जाणार आहे. म्हणजेच LVM-3 रॉकेट एकामागून एक सोडले जाणार आहेत.
त्याचे मॉड्यूल्स म्हणजेच भाग अवकाशात जोडले जातील. चांद्रयान-4 चे दोन भाग अवकाशात जोडले जाणार असून ते वेगळे केले जातील. म्हणजे डॉकिंग-अनडॉकिंग असणार आहे.
डॉकिंगचे प्रात्यक्षिक करण्यासाठी SPADEX मिशन या वर्षाच्या अखेरीस केलं जाऊ शकतं.
एक मानवरहित लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार असून रोव्हर बाहेर पडेल आणि चंद्रावरून नमुने गोळा करेल.
'या' फोटोमध्ये बंद डोळे असलेली मुलगी शोधा