ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चांद्रयान-३ या भारताच्या अंतराळ मोहिमेची आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
बुधवारी २३ ऑगस्टला चांद्रयान-३ सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर लँडिंग करणार आहे.
चंद्रावर उतरल्यानंतर हे यान नेमकं काय करणार असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल तर ते जाणून घ्या.
साधारणत: १ सेमी प्रति सेकंदाच्या वेगाने हे प्रज्ञान चंद्राचा परिसर स्कॅन करणार आहे यावेळी तिरंगा आणि इस्रोच्या लोगोचे ठसे तेथे उमटणार आहेत ज्यामुळे चंद्रावर भारताची निशाणी असणार आहे.
चंद्राच्या पृष्ठभागाशी संबंधित डेटा प्रदान करण्यासाठी रोव्हरमध्ये पेलोडसह कॉन्फिगर केलेली उपकरणे आहेत. ते चंद्राच्या वातावरणातील मूलभूत रचनेचा डेटा गोळा करतील.
तीन पेलोडसह, विक्रम लँडर पृष्ठभागाच्या जवळील प्लाझ्मा (आयन आणि इलेक्ट्रॉन) घनता मोजणार आहे.