ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजचा दिवस भारतासाठी खुप महत्वाचा आहे. चांद्रयान- ३ इतिहास रचला आहे
चांद्रयान- ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग झालं आहे.
अभियान यशस्वी झाल्यास दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरेल.
आतापर्यत चांद्रयान-३ यशस्वीरित्या त्याच्या मार्गावर आहे.
चांद्रयान-३ चंद्रावर पाठवण्यासाठी इस्रोने जड रॉकेटचा वापर केला आहे.
पृथ्वी ते चंद्र या ३,८४,००० किमी प्रवासासाठी कोणते इंधन वापरले गेले असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे
माहितीनुसार, चांद्रयान -३ मध्ये १५० किलो इंधन शिल्लक होते. चांद्रयान -३ मध्ये घन आणि द्रव इंधनाचा वापर करण्यात आला असून क्रायोजेनिक इंजिन शेवटच्या टप्प्यात काम करत आहे.
नासाने रॉकेटच्या इंधन टाकीचे फोटो शेअर केले आहेत. यानुसार रॉकेटमध्ये किती इंधन टाकी वापरली आहे हे दिसून येते
रॉकेट इंधनात दोन भागांमध्ये विभागले आहे. त्यातील एका भागात इंधन आणि दुसऱ्या भागात ऑक्सिडायझर असते. जेव्हा अंतराळात ऑक्सिजन नसतो तेव्हा ऑक्सिडायझर स्वत: रॉकेटला शक्ती देत असते.