ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
'चंद्रमुखी' या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात असणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या चर्चेत आहे.
अमृताने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने लाखो चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.
अभिनय आणि सौंदर्यच नव्हे, तर अमृतानं नृत्यानं फॅन्सना वेड लावलंय.
अमृताच्या ‘चंद्रा’ गाण्याने साऱ्यांनाच मंत्रमुग्ध केले आहे.
अख्ख्या महाराष्ट्राला नाचवणाऱ्या चंद्राची भुरळ देशातीलच नव्हे तर जगभरातील चाहत्यांना पडली आहे.
सोशल मीडियावर अमृता तिचे फोटो पोस्ट करत असते.
वेगवेगळ्या अंदाजातले अमृताचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस येतात.