Shreya Maskar
कात 'अकेशिया कॅटेचू' किंवा खैर या झाडापासून मिळवला जातो. याचा वापर आयुर्वेदात केला जातो. याचे शरीराला होणारे फायदे जाणून घेऊयात.
घसादुखी कमी करण्यासाठी, दातांवरील थर (plaque) कमी करण्यासाठी आणि हिरड्यांमधून होणारा रक्तस्राव, अस्वस्थता नियंत्रित करण्यासाठी कात पाउडरने गुळण्या केल्या जातात.
यामध्ये टॅनिन असतात जे आतड्यांचे अस्तर घट्ट करण्यास आणि सौम्य अतिसार नियंत्रित करण्यास मदत करतात.
कातमधील शुद्धीकरण गुणधर्मांमुळे लहान जखमा, त्वचेवरील पुरळ आणि फोड लवकर बरे होण्यास मदत करण्यासाठी पारंपरिक लेपांमध्ये मिक्स करून लावले जाते.
केस मुलायम करण्यासाठी, मुळे मजबूत करण्यासाठी आणि निरोगी टाळूसाठी नैसर्गिक पॅक म्हणून अनेकदा मेहंदी किंवा गुलाब पाण्यात मिसळले जाते.
खोकला कमी करण्यासाठी, कफ कमी करण्यासाठी आणि श्वासनलिकेतील जळजळ कमी करण्यासाठी पारंपरिक औषधनिर्मिती आणि गोळ्यांमध्ये कात वापरली जाते.
यामध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि कॅटेचिन्स असतात, जे प्राथमिक दाहक-विरोधी फायदे देतात. कधीकधी सांध्यांवरील सूजेसाठी हे फायदेशीर ठरते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.