Sakshi Sunil Jadhav
मांजर ही घरातल्या एका तरी व्यक्तीची आवडती असते. रस्त्यावर, कोणा शेजाऱ्या पाजाऱ्याच्या घरात तुम्हाला मांजर दिसतच असेल.
तुम्ही मांजर प्रेमी असाल तर तुम्हाला काही गोष्टींबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. पुढे आपण लोकांच्या मनात असणाऱ्या प्रश्नाचे किंवा भीतीचे उत्तर जाणून घेणार आहोत.
मांजर प्रेमी नेहमी मांजरीसोबत खेळतात, त्यांच्यासोबत शांतपणे राहतात अशा प्रेमळ स्वभावाच्या असतात. पण काही मांजरी या विरुद्ध काम करत असतात.
काही मांजरी या ठराविक लोकांना बघूनच त्यांच्यावर ओरडतात, पंजा मारतात, नखांनी ओरबडून काढतात. असं का होतं? चला जाणून घेऊ.
मांजर ही खूप भित्री असते. जेव्हा तिला एखाद्या व्यक्तीने त्रास दिलेला असतो किंवा एखाद्या व्यक्तीचा आवाज खूप मोठा असतो अशा माणसांना पाहून मांजर घाबरते.
मांजर जेव्हा घाबरते तेव्हा स्वत: ला वाचवण्यासाठी ती समोरच्या व्यक्तीला पंजा मारते. याने तुमच्या हाताला किंवा ती चावते त्या भागाला जखमा होऊ शकतात.
तुमच्या Body Language किंवा भीतीच्या वासावरुन प्राणी तुम्हाला ओळखू शकतात. काही वेळेस ते डोळ्यात पाहून सुद्धा ओळखतात. त्यामुळे मांजरीच्या जवळ येणारी व्यक्ती तिला अस्वस्थ करत असेल तर ती पंजा मारु शकते.
मांजर पंजा मारण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे जेव्हा तिच्या झोपेच्या जागेवर, जेवणाजवळ किंवा पिल्लांजवळ अनोखळी व्यक्ती गेली तर आक्रमक होते.