Caste Certificate: कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी किती खर्च येतो?

Bharat Jadhav

जातीचा दाखला म्हणजे काय

जातीचा दाखला म्हणजे एखादी व्यक्ती विशिष्ट जातीची किंवा जमातीची आहे, हे प्रमाणित करणारा शासकीय किंवा सरकारी दस्तऐवज होय.

How much does a caste certificate cost in Maharashtra?

ऑनलाईन जातीचा दाखला कसा काढायचा

ऑनलाईन जातीचा दाखला काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत आपले सरकार पोर्टल या संकेतस्थळाचा वापर करावा.

How much does a caste certificate cost in Maharashtra?

अर्ज करण्याची प्रक्रिया

आपले सरकार पोर्टल वर जा. त्यानंतर 'New User? Register Here' या पर्यायावर क्लिक करून मोबाईल नंबर आणि ओटीपी टाकून नवीन खाते तयार करा. तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड तयार करा.

How much does a caste certificate cost in Maharashtra?

जातीचा दाखला मिळवण्यासाठी असा भरा अर्ज

आपले सरकार पोर्टलवर तयार केलेल्या युजर आयडी व पासवर्डद्वारे पोर्टलवर लॉगिन करा. डाव्या बाजूला असलेल्या विभागांमधून 'Revenue Department' पर्याय निवडा. त्यानंतर 'Caste Certificate' या पर्यायावर क्लिक करा. विचारलेली सर्व माहिती (नाव, पत्ता, जात, जन्मतारीख इ.) काळजीपूर्वक भरावी.

How much does a caste certificate cost in Maharashtra?

किती रुपये लागतात

ऑनलाईन किंवा महा-ई-सेवा केंद्राद्वारे अर्ज करताना साधारण ४० रुपये शासकीय फी असते, तर प्रिंटिंग आणि पोर्टल शुल्कासह हा खर्च अंदाजे ७६ ते १२८ रुपयांपर्यंत लागू शकतो.

How much does a caste certificate cost in Maharashtra?

एजंट किती रुपये घेतो

जर तुम्ही कोणत्याही एजंट किंवा दलालाच्या माध्यमातून हे काम करून घेतले,तर ते १००० ते १५०० रुपये किंवा त्याहून अधिक रुपयांची मागणी करू शकतात. त्यामुळे तुम्ही आपलं सरकार पोर्टल किंवा जवळच्या अधिकृत महा-ई-सेवा केंद्रावरून थेट अर्ज करावा.

How much does a caste certificate cost in Maharashtra?

जातीचा दाखला काढण्यासाठी काय कागदपत्रे लागतात

ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र द्यावे. रहिवासी पत्त्यासाठी आधार कार्ड, लाईट बिल किंवा रेशन कार्ड द्यावे. वयाचा व जातीचा पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट द्या. वडिलांचा किंवा आजोबांचा जुना शाळा सोडल्याचा दाखला द्या. स्वयं-घोषणापत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटोही द्यावा.

How much does a caste certificate cost in Maharashtra?

कास्ट सर्टिफिकेट किती दिवसात मिळते?

महाराष्ट्रात सेतू केंद्र किंवा ऑनलाईन अर्ज केल्यानंतर कास्ट सर्टिफिकेट (जात प्रमाणपत्र) साधारणपणे २५ ते ४५ दिवसांच्या आत मिळत असते.

How much does a caste certificate cost in Maharashtra?