Car Cabin Air Filter: कारची एसी फुल्ल, पण कुल होत नाही, केबिन फिल्टर कधी बदलावा?

Surabhi Jayashree Jagdish

उन्हाळ्यात कारच्या एसीचा वापर

उन्हाळ्यात कारमध्ये खूप उकाडा जाणवत असल्याने एसीची गरज वाढते. कारच्या एसीमध्ये अनेक भाग असतात, जे केबिन थंड ठेवण्यासाठी मदत करतात. त्यापैकी कॅबिन एअर फिल्टर हा एक महत्त्वाचा भाग आहे.

Car AC Not Cooling | saam tv

एसीची हवा स्वच्छ ठेवतो

कारचा एसी व्यवस्थित काम करण्यासाठी कॅबिन एअर फिल्टर स्वच्छ आणि चांगल्या स्थितीत असणं गरजेचं आहे. हा फिल्टर हवेतली धूळ, माती आणि इतर बारीक कण अडवण्यास मदत करतो. त्यामुळे कारच्या केबिनमध्ये येणारी हवा स्वच्छ राहण्यास मदत होते.

Car AC Bad Smell | saam tv

किती दिवसांनी फिल्टर बदलावा?

कारचा कॅबिन फिल्टर किती वेळाने बदलावा हे कारचं मॉडेल आणि वापरावर अवलंबून असते. साधारणपणे १२ हजार ते १५ हजार किलोमीटर प्रवासानंतर किंवा दोन वर्षांच्या आत फिल्टर बदलण्याची गरज तपासावी.

Car AC Dust Problem | saam tv

एसीमधून कमी थंड हवा येणं

एसी सुरू असूनही थंड हवा कमी येत असेल, तर कॅबिन फिल्टरमध्ये धूळ साचली असण्याची शक्यता असते. फिल्टरमध्ये धूळ साचल्यामुळे हवेला त्यातून जाण्यास अडथळा येऊ शकतो. मात्र एसी कमी थंड होण्यामागे गॅस कमी असणं कारण असू शकतं.

Car AC Summer Tips | saam tv

एसीमधून दुर्गंधी येणं

कारचा एसी सुरू केल्यावर कुबट किंवा घाणेरडा वास येत असेल तर फिल्टर तपासून घ्यावा. फिल्टरमध्ये धूळ आणि इतर कण साचल्यामुळे त्यातून येणाऱ्या हवेत दुर्गंधी जाणवू शकते. एसीतील ओलावा किंवा बुरशीमुळेही असा वास येऊ शकतो.

Cabin Air Filter Benefits | saam tv

एसीच्या व्हेंटमधून धूळ येणं

एसीच्या व्हेंटमधून हवा येताना केबिनमध्ये धूळ किंवा बारीक कण पसरत असतील तर केबिन फिल्टर तपासणे गरजेचं आहे. फिल्टर खूप घाण झालेला किंवा फाटलेला असल्यास धुळीचे कण केबिनमध्ये येऊ शकतात.

When to Change Car AC Filter | saam tv

फिल्टर बदलताना काय काळजी घ्यावी?

एसीचा फिल्टर बदलण्याची वेळ आली असल्याचे वरीलपैकी कोणतंही लक्षण दिसल्यास तो तपासून घ्या. काही कारमध्ये हा फिल्टर सहज बदलता येतो, तर काही मॉडेलमध्ये तो बदलण्यासाठी विशिष्ट पद्धत वापरावी लागते.

Car AC Airflow Problems | saam tv

Refrigerator placement: घरात भिंतीपासून किती अंतराच्या दूर ठेवला पाहिजे फ्रीज?

Refrigerator placement | saam tv
येथे क्लिक करा