Priya More
भारतामध्ये कॅन्सरच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. महिलांना जास्त प्रमाणात कॅन्सर होत आहे.
गेल्या वर्षभरामध्ये भारतामध्यचे कॅन्सरचे १४ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले होते.
कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी सर्वांनी वेळीच सावध होणं गरजेचे आहे.
जर आहारात किंवा व्यायामात कोणताही बदल न करता तुमचे वजन वेगाने कमी होत असेल तर हे कॅन्सरचे एक प्रमुख लक्षण आहे.
जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे कॅन्सरचे दुसरे सामान्य लक्षण आहे.
पोटदुखी, स्तनातील गाठ किंवा सूज याकडेही अजिबात दुर्लक्ष करू नका.
आजकाल खाण्याच्या चुकीच्या सवयी, अनियमित जीवनशैली, तंबाखू सेवन आणि हार्मोनल असंतुलन यामुळे कॅन्सर होण्याचा धोका आहे.
कॅन्सरच्या लक्षणांकडे लक्ष देणं आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्वाचे आहे.