Shruti Vilas Kadam
काही प्रकारचे कॅन्सर हे कुटुंबातील आनुवंशिक बदलांमुळे होऊ शकतात. स्तन, अंडाशय किंवा मोठ्या आतड्याच्या कॅन्सरमध्ये हा धोका अधिक असू शकतो.
वय वाढल्यावर शरीरातील पेशींमध्ये नैसर्गिक बदल होतात. त्यामुळे डीएनएमध्ये त्रुटी जमा होऊन कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
हवेतील प्रदूषण, काही औद्योगिक रसायने, कीटकनाशके किंवा विषारी पदार्थांच्या दीर्घकालीन संपर्कामुळे व्यसन नसतानाही कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
एचपीव्ही (HPV), हिपॅटायटिस बी आणि सी यांसारखे काही व्हायरस विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढवू शकतात. त्यामुळे लसीकरण आणि योग्य उपचार महत्त्वाचे आहेत.
व्यसन नसले तरी सतत जंक फूड खाणे, शारीरिक हालचालींचा अभाव, लठ्ठपणा आणि अपुरी झोप यामुळे शरीरातील दाह वाढून कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो.
ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते किंवा काही दीर्घकालीन आजार असतात, त्यांच्यामध्ये काही प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
काही रुग्णांमध्ये कोणतेही व्यसन, आनुवंशिक इतिहास किंवा स्पष्ट कारण नसतानाही कॅन्सर होतो. शरीरातील पेशींमध्ये अचानक झालेले बदलही यामागे कारणीभूत असू शकतात.