ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतीय रेल्वे ही देशाची जीवनरेखा आहे. यामध्ये दररोज करोडो लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवास करतात.
रेल्वेच्या नियमांनुसार, जर तुमचा प्रवास कोणत्याही कारणास्तव रद्द झाला, तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला तुमच्या जागेवर पाठवू शकता.
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या तिकिटाची प्रिंट काढावी लागेल. त्यानंतर रेल्वेच्या आरक्षण काउंटरवर जाऊन अर्ज द्यावा लागेल. त्या अर्जात तुमचा प्रवास रद्द केल्याचे कारण द्यावे लागेल.
या अर्जासोबत तुम्हाला त्या व्यक्तीच्या आधार कार्ड किंवा पॅन कार्डची फोटो कॉपी देखील जोडावी लागेल.
तुम्हाला हा अर्ज प्रवास सुरू होण्याच्या 2 दिवस आधी द्यावा लागेल. त्यानंतरच रेल्वे तिकिटावर तुमचे नाव कापून इतर प्रवाशाचे नाव टाकण्याची प्रक्रिया सुरू होते.
भारतीय रेल्वे ट्रेन तिकीट हस्तांतरण नियमांनुसार, ही सुविधा फक्त त्या प्रवाशांना दिली जाते ज्यांच्याकडे कन्फर्म सीट बुकिंग तिकीट आहे.
प्रतीक्षा यादीत असलेल्यांना ही सुविधा मिळत नाही.