Ankush Dhavre
अनेकांना वाटतं की वटवाघुळ आंधळे असतात, पण हे पूर्णपणे सत्य नाही. त्यांची दृष्टी फक्त रात्रीच्या जीवनशैलीसाठी विकसित झालेली असते.
वटवाघुळांच्या डोळ्यांची रचना अशा प्रकारे असते की त्यांना कमी प्रकाशात जास्त चांगलं दिसतं, पण दिवसाच्या उजेडात त्यांची दृष्टी प्रभावी नसते.
वटवाघुळांना कमी प्रकाशात जास्त चांगलं दिसण्यासाठी त्यांच्या डोळ्यातील रॉड सेल्स (Rod Cells) जास्त असतात, जे रात्री अधिक संवेदनशील असतात.
वटवाघुळ दिवसा कमी प्रमाणात दिसत असले तरी ते ‘इकोलोकेशन’चा (Echolocation) वापर करून त्यांच्या सभोवतालच्या गोष्टी ओळखतात.
काही वटवाघुळांच्या जाती दिवसा अन्न शोधतात, त्यामुळे त्यांना प्रकाश सहन करण्यास त्रास होत नाही.
वटवाघुळांना रंग स्पष्ट ओळखता येत नाहीत. त्यांची दृष्टी प्रामुख्याने ग्रे-शेड्स आणि ब्लर झालेल्या प्रतिमांवर अवलंबून असते.
त्यांची जीवनशैली निशाचर (Nocturnal) असल्यामुळे ते दिवसा झोप घेतात आणि रात्री अन्न शोधतात.
जरी बहुतांश वटवाघुळ निशाचर असले तरी काही प्रकारचे वटवागुळ दिवसा सक्रिय राहतात आणि फळांवर उपजीविका करतात.