Shraddha Thik
सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. या ऋतूमध्ये ताक, शहाळे, सरबत पिणे खूप महत्त्वाचे आहे.
दही हे अत्यंत गुणकारी आहेच. दह्यात थोडे पाणी घालून घुसळून त्याचे ताक केले असता ते जास्त गुणकारी ठरते.
आयुर्वेदात ताकाचे अनेक गुणधर्म सांगितले आहेत. शरीराची पचन व्यवस्था स्वच्छ करणारे गुणधर्म असतात.
जेवण झाल्यानंतर थोडे सैंधव मीठ घातलेले ग्लासभर ताक पिण्याने अन्न पचण्यास खूप मदत होते.
ताकात सुंठ, काळी मिरी घालून सेवन केले असता कफ दोष कमी होतो.
नियमित ताक प्यायल्याने आपल्या शरीराची पचन शक्ति सुधारते. मूळव्याध, बद्धकोष्टता कमी होते. आयुर्वेदात मुळव्याधीवर नियमित ताक पिणे हा घरगुती उपाय सांगितला आहे.
लघवी करताना वेदना होत असतील तर ताजे व पातळ ताक प्यावे.