Shraddha Thik
उन्हाळा सुरू झाला की प्रत्येकाला काही थंडगार पेय पिण्याची इच्छा होते.
सध्या देशभरात काही ठिकाणी उष्णता जाणवू लागली आहे, या उष्णतेच्या लाटेमुळे देशभरातील लोक घामाघूम झाले आहेत. या उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी लोकं ताक, पन्ह किंवा काहीजण सॉफ्टड्रिंक असे पेय घरी आणतात.
जर आपल्याला साखरयुक्त पेय टाळायचे असेल तर, उन्हाळ्यात ताक प्या. पण बरेच जण तिन्ही वेळ किंवा कोणत्याही वेळेत ताक पितात.
ताक प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. ताकामध्ये पौष्टीक घटक मिळवण्यासाठी ताक कधी प्यावे जेवनाआधी किंवा नंतर
एका पोषणतज्ज्ञांनुसार, उन्हाळ्यात शरीराला पोषण यासह गारवा मिळावा, यासाठी ताक पिणे गरजेचं आहे.
दुपारी जेवणाच्यावेळी नियमित ताक प्यायल्याने आरोग्याला खूप फायदे मिळतात.
शरीरातील पौष्टीक्तेने परिपूर्ण, पचनक्रिया सुधारते, बॉडी हायड्रेट राहते, फ्रेश आणि ताजेतवाने, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा साठा वाढतो.