Burns-First Aid : स्वयंपाक करताना भाजलात?६० सेकंदांत करा 'हे' काम, लगेच मिळेल आराम

Shreya Maskar

स्वयंपाक करताना भाजले

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, स्वयंपाक करताना भाजले किंवा चटका बसल्यास पहिल्या मिनिटाला त्या भागावर किमान १० ते १५ मिनिटे थंड पाणी ओतत रहावे. पाणी बर्फा इतके थंड नसावे, याची काळजी घ्या.

Burned while cooking | pinterest

थंड पाणी नसेल तर...

जर वाहते थंड पाणी उपलब्ध नसेल, तर थंड आणि ओल्या कपड्याचा वापर करा. मात्र कपडा नवीन, स्वच्छ आणि मऊ असेल याची खबरदारी घ्या.

If there is no cold water... | pinterest

घट्ट वस्तू काढा

सूज येण्यापूर्वी भाजलेल्या भागाजवळील अंगठ्या, घड्याळ, बेल्ट किंवा घट्ट कपडे हळूवारपणे काढून टाका. त्वचेला चिकटलेले कपडे ओढून काढू नका, पाण्याच्या सहाय्याने हळूहळू काढण्याचा प्रयत्न करा.

Remove tight objects | pinterest

जखम झाकून ठेवा

त्वचेच्या संरक्षणासाठी तो भाग स्वच्छ व कोरड्या कपड्याने किंवा स्वच्छ प्लास्टिक रॅपसह सैलसर झाकून ठेवा. कोणतीही औषधे घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Cover the wound | pinterest

काय करू नये

बर्फ वापरू नका. फोड फोडू नका. घरगुती उपाय टाळा. ताज्या भाजलेल्या जखमेवर लोणी, तेल, टूथपेस्ट किंवा मलम लावू नका, कारण त्यामुळे उष्णता आतच अडकून राहते.

what not to do | pinterest

तातडीची वैद्यकीय मदत

भाजलेली जखम ३ इंचांपेक्षा मोठी असेल आणि चेहरा, हात, पाय, जांघ, नितंब किंवा शरीराचा एखादा मुख्य सांधा भाजला असेल, तर डॉक्टरांकडे त्वरित पळा.

Emergency medical care | pinterest

गंभीर परिस्थिती

भाजलेला भाग करपल्यासारखा किंवा चामड्यासारखा दिसत असेल किंवा त्यावर पांढरे, तपकिरी किंवा काळे डाग पडले असतील तर काही मिनिटांतच डॉक्टरांकडे जा.

critical situation | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : आंबट समजून 'स्टार फ्रूट'कडे करताय दुर्लक्ष, ते हृदयासाठी गुणकारी; फायदे वाचून व्हाल थक्क

Star Fruit | AI PHOTO
येथे क्लिक करा...