Budget Foreign Tourism: भारतापासून फक्त 9 तासांवर पाहा परदेशचा नजारा! कमी बजेटमध्ये परदेश फिरायचा असेल तर हे ठिकाण पाहाच

Sakshi Sunil Jadhav

परदेशी जाण्याचे स्वप्न

परदेशात फिरायचं स्वप्न अनेकांचं असतं, पण खर्चामुळे अनेकजण फिरणं टाळतात. मात्र आशियामध्ये एक असा देश आहे जिथे कमी बजेटमध्येही परदेश प्रवासाचा आनंद घेता येतो. हा देश म्हणजे Laos. जो भारतापासून जवळ आहे.

Budget Foreign Tourism | pintrest

भारतापासून कमी अंतर

भारताची राजधानी New Delhi येथून लाओसची राजधानी Vientiane येथे फ्लाइटने साधारण 9 ते 11 तास लागतात. बहुतेक फ्लाइट्स Thailand किंवा इतर आशियाई शहरांमार्गे जातात.

budget foreign trip | google

कमी खर्चात परदेश प्रवास

लाओसला जगातील स्वस्त देशांपैकी एक मानले जाते. तुम्हाला इथे राहणं, खाणं आणि फिरणं इतर देशांच्या तुलनेत खूपच स्वस्त पडेल.

Laos travel from India

भारतीयांसाठी किफायतशीर चलन

तुम्हाला इथे चलन भारतीय रुपयाच्या तुलनेत कमी असल्यामुळे भारतीय पर्यटकांना ईथे खर्च कमी वाटतो.

cheap international destination | pintrest

स्वस्त अॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटीज

लाओसमध्ये कमी पैशांत साहसी अनुभव घेता येतात. काही ठिकाणी फक्त 200 रुपयांत वॉटरफॉल पाहता येतो, सुमारे 1000 रुपयांत झिपलाइन आणि सुमारे 5000 रुपयांत हॉट एअर बलून राइड करता येते.

Laos tourism

स्वस्त लोकल ट्रान्सपोर्ट

पर्यटक फक्त सुमारे 300 रुपयांत स्कूटी भाड्याने घेऊन शहर आणि आसपासच्या भागात फिरू शकतात. ट्रेनने प्रवासही साधारण 1000 रुपयांत होतो.

Laos tourism

नैसर्गिक सौंदर्याची खाण

लाओस पर्वत, घनदाट जंगल, सुंदर धबधबे आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. ग्रामीण भाग आणि वॉटरफॉल पर्यटकांना विशेष आकर्षित करतात.

Laos tourism

मेकाँग नदीचे महत्त्व

प्रसिद्ध Mekong River लाओसच्या पश्चिम भागातून वाहते. शेती, व्यापार आणि पर्यटनासाठी ही नदी स्थानिक लोकांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे.

Laos tourism

लाओस ट्रीप

कमी बजेटमध्ये परदेश फिरायचा विचार करत असाल तर लाओस हा भारतीय पर्यटकांसाठी एक आकर्षक आणि किफायतशीर पर्याय ठरू शकतो.

Laos tourism | google

NEXT: Lasooni Palak Paneer Recipe: रोजचा वरण भात खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा लसुणी पालक पनीर, वाचा रेसिपी

palak paneer dish
येथे क्लिक करा