Siddhi Hande
दिवाळीसाठी अनेक कंपन्यांनी ऑफर लाँच केल्या आहेत. नुकतीच बीएसएनएल कंपनीने फ्री सिमची एक ऑफर दिली आहे.
बीएसएनएल कंपनीने आपलं 4G नेटवर्क लाँच केले. त्यानंतर दिवाळीसाठी एक भन्नाट ऑफर दिली आहे.
यामध्ये तुम्हाला १ रुपयात अनलिमिटेड कॉल आणि रोज 2GB डेटा आणि १०० एसएमएस मिळणार आहे.
कंपनीने आपले फ्री सिम कार्ड दिले आहे. ही ऑफर फक्त नवीन ग्राहकांसाठी आहे.
जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या कंपनीचे कार्ड वापरत असाल आणि तुम्हाला BSNL मध्ये स्विच करायचे असेल तर तुम्हाला ही ऑफर मिळणार आहे.
१५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर ही ऑफर असणार आहे. या कालावधीत तुम्हाला फ्री सिम कार्ड मिळणार आहे.
दिवाळीसाठी सरकारी कंपनीने ही नवीन ऑफर लाँच केली आहे. जेणेकरुन जास्तीत जास्त ग्राहकांनी सिम कार्ड घ्यावे.