Breast Cancer: पुरुषांनो ही लक्षणं दिसली तर समजा ब्रेस्ट कॅन्सर झालाय!

Surabhi Jayashree Jagdish

पुरुषांनाही स्तन कॅन्सरचा धोका

फक्त महिलांनाच नाही, तर पुरुषांनाही स्तन कॅन्सर होऊ शकतो. हा आजार कमी प्रमाणात दिसतो, पण दुर्लक्षित केल्यास गंभीर ठरू शकतो. म्हणून पुरुषांनीही याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे.

कॅन्सरचा ट्यूमर

पुरुषांमध्ये स्तनाच्या पेशी कमी असतात, त्यामुळे हा आजार कमी प्रमाणात दिसतो. पण लहान ट्यूमरही लवकर आसपासच्या भागात पसरू शकतो. यामुळे कॅन्सर वेगाने वाढण्याचा धोका वाढतो.

स्तनात वेदनारहित सूज

स्तनात कोणतीही वेदना नसलेली सूज दिसल्यास दुर्लक्ष करू नका. त्वचेवर लालसरपणा किंवा बदल दिसणे हेही संकेत असू शकतात.अशा लक्षणांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.

लहान गाठी जाणवणं

स्तनात लहान-लहान गाठी जाणवणं हे महत्त्वाचं लक्षण आहे. या गाठी सुरुवातीला वेदनारहित असू शकतात. पण त्या हळूहळू वाढू शकतात, त्यामुळे तपासणी आवश्यक आहे.

निपलमधून रक्त

निपलमधून रक्तस्राव किंवा पांढरा स्त्राव येणे हे गंभीर लक्षण आहे.स्तनाभोवती त्वचेत बदल, वेदना किंवा अस्वस्थता जाणवू शकते. हे लक्षण दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

अंडरआर्म्स सूज

बगल भागात सूज येणे किंवा गाठ जाणवणे हेही लक्षण असू शकते. लिम्फ नोड्स सुजल्यामुळे ही समस्या दिसते. अशी लक्षणं दिसल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी करावी.

Kolhapur Tourism: खरंच लोणावळा-खंडाळा विसराल; कोल्हापूरपासून फक्त २१ किमी लांब आहे हे हिल स्टेशन

येथे क्लिक करा