Shraddha Thik
नोकरी करणे म्हणजे एकाच जन्मात अजून एक आयुष्य जगण्यासारखे असते.
जेव्हा तुम्ही नोकरीला लागता तेव्हा तुमचे वैयक्तिक आयुष्य वेगळे होते आणि तुमचे प्रोफेशनल आयुष्य वेगळे होते.
या प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्हाला बॉस नामक व्यक्तीशी अगदी चांगले संबंध ठेवावे लागतात.
जेवढे चांगले संबंध तुमचे तुमच्या बॉसशी असतील तेवढे तुमचे हे प्रोफेशनल लाईफ अधिक चांगले राहील.
तुम्हाला पाहिल्यावर नेहमी स्मितहास्य करणारा बॉस जेव्हा तुम्हाला काम करताना पाहूनही चेहऱ्यावरचे हावभाव बदलत नाही, आणि काहीच व्यक्त न होता निघून जातो तेव्हा समजून जावे की बॉसला आपल्याशी काहीतरी प्रॉब्लेम नक्की आहे.
जसे की नेहमी कामाव्यतिरिक्त तुमची इतर चौकशी करणारा बॉस जेव्हा तुम्हाला काहीच विचारत नाही आणि केवळ कामाच्याच गोष्टी करू लागतो तेव्हा तो एक संकेत असतो की बॉस तुम्हाला नापसंत करू लागला आहे.
सतत कामाची स्तुती करणारा बॉस ज्या दिवसापासून तुमच्या कामात सतत चूका काढू लागतो तेव्हा समजून जावे की बॉसला तुमच्याशी नक्कीच काहीतरी समस्या आहे. अशावेळी इतर सहकाऱ्यांनी तुमच्या विषयी बॉसच्या मनात चुकीचे मत निर्माण केल्याची शक्यताही नाकारता येत नाही.
विनाकारण छोट्यातील छोट्या चूका काढणे आणि सगळ्यांसमोर ओरडणे, राग व्यक्त करणे, मात्र तुमच्या पेक्षा कमी कार्यक्षम कर्मचाऱ्याला मात्र चांगली वागणूक देणे हेच दर्शवते की बॉसच्या मनातील तुमच्या विषयीचा आदर आणि प्रेम संपलेले आहे.