Priya More
१३ ऑक्टोबरला राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त फक्त 99 रुपयांमध्ये प्रेक्षकांना त्यांच्या आवडते चित्रपट पाहायला मिळणार आहे.
तुम्हाला तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत फक्त ९९ रुपयांमध्ये तुमच्या आवडत्या चित्रपटांचा आनंद घेता येणार आहे.
राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त 'फुकरे' फ्रँचायझी चित्रपटाचा तिसरा भाग असलेल्या 'फुकरे 3' चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त प्रेक्षकांना 'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपट पाहायला मिळणार आहे. विवेक अग्निहोत्रींनी एक सत्यकथा 'द व्हॅक्सिन वॉर' रुपेरी पडद्यावर आणली आहे.
राजश्री प्रॉडक्शनच्या बॅनरखाली अवनीश बडजात्या दिग्दर्शित 'दोनो' ही नवीन काळातील प्रेमकथा प्रेक्षकांना राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त पाहायला मिळणार आहे.
अभिनेता अक्षय कुमारच्या 'मिशन राणीगंज - द ग्रेट भारत रेस्क्यू' चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपटही तुम्हाला उद्या पाहायला मिळणार आहे.
अनिल कपूरची मुलगी रिया कपूरने जितेंद्र यांची मुलगी एकता कपूरसोबत 'थँक यू फॉर कमिंग' या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
'800' हा चित्रपट क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक विकेट घेणारा क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन यांच्या जीवनावर आधारित बायोपिक आहे.
दिग्दर्शक डेव्हिड गॉर्डन ग्रीनचा 'द एक्सॉर्सिस्ट: बिलीव्हर' हा एक भयपट चित्रपट आहे.
दिग्दर्शक क्रेग गिलेस्पी यांच्या 'डंब मनी' चित्रपटाची कथा किथ गिल नावाच्या एका सामान्य माणसाभोवती फिरते.
'धक धक' चित्रपटाची निर्मिती तापसी पन्नूने केली आहे. बाईकला आपल्या आयुष्यात महत्त्व देणाऱ्या चार महिलांचा प्रवास या चित्रपटामध्ये दाखवण्यात आला आहे.
'पॉ पेट्रोल: द माइटी मूव्ही' हा कॅनडियन कम्प्यूटर- अॅनिमेटेड सुपरहिरो कॉमेडी चित्रपट आहे. जो कॅल ब्रंकर दिग्दर्शित Paw Patrol या टेलिव्हिजन मालिकेवर आधारित आहे.