साम टिव्ही ब्युरो
फातिमा सना शेख ही बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रीपैंकी एक आहे.
बॉलिवूडची दंगल गर्ल अशी ओळख असणारी अभिनेत्री फातिमा ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
सोशल मीडियावर फातिमा कायम सक्रिय असते.
फातिमाने नुकतचं सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला आहे.
फोटो पोस्ट करत फातिमाने ती एका आजाराशी लढत असल्याचे सांगितले आहे.
फातिमाला एपिलेप्सी हा आजार झाला आहे. स्वत: फातिमाने याबाबत सांगितले आहे.
फातिमा सना शेख या आजाराकडे सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी आणि लोकांमध्ये याबद्दल जागृती करण्यासाठी सतत प्रयत्न करते.
अभिनेत्री फातिमाने दंगलसोबतच ठग्स ऑफ हिंदूस्थान, लूडो, थार यांसारख्या हिट चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.